मिस्टर सानेंनी हळू डोळे उघडले. खिडकीतून उन्हं येत होती. खाडकन जागे झाले. दुपार झाली कि काय! घड्याळ बघितल, हुश्श, आठच वाजतायेत! पण पुढच्याच क्षणी लक्षात आलं, आठ वाजले तरी किचन मधून काही आवाज येत नाहीयेत. आज तर गुरुवार, वर्किंग डे, एव्हाना किचन मधून आवाजच नव्हे तर तर-तर्हेचे वासही यायला हवेत. डबा तयार झाला असला पाहिजे, चहा तयार झाला आला पाहिजे. पण आज कसलीच हालचाल दिसत नाही! शेजारी पहिल तर मिसेस सानेही शेजारी नाहीत. काय भानगड आहे बुआ आज? चष्मा चढवून मिस्टर साने बेडरूम मधून बाहेर आले. मिसेस सानेंचा घरात कुठेच पत्ता नव्हता! गेली कुठे ही? मिस्टर सानेंनी सुनबाईंना विचारायच ठरवलं. पण श्वेता त्यांना कुठे दिसेना. इतक्यात, "गुडमॉर्निंग बाबा!" म्हणत श्वेता जांभई देत बाहेर आली आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता, तडक "गुडमॉर्निंग आई" म्हणत किचन मध्ये गेली. मिस्टर साने तिला काही सांगणार इतक्यात, "अहो बाबा, आई कुठेयत?" म्हणत पुन्हा बाहेर आली. एव्हाना तिची झोप पूर्णपणे उडाली होती. "माहित नाही बुआ, मला वाटलं तुला काही बोलली असेल..." त्यांन...
Seeing the extraordinary in the ordinary