Skip to main content

Posts

Showing posts with the label marathi

आई, बाबा, आणि सोशल मीडिया...

"ओळख पाहू ही  कोण?" मी आईच्या हातातल्या फोन मध्ये डोकावलो. फोटोत एक तरुणी, सायकल वर स्वार, ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट  घातलेली, कॅमेऱ्याकडे पाहून स्मितहास्य करीत होती. "अरे पाहतोयस काय नुसता, ओळख ना कोण आहे ही." पुन्हा आईने विचारले. मी मक्खपणे मान हलवली. "मला नाही माहीत."  "अरे, हि नमिता! छत्र्यांची!" "बरं..." "अरे बरं काय? तुझ्या शाळेत होती ही! नर्सरीत तुझा डबा खायची बघ? आणि तू उपाशी, रडत रडत घरी यायचास..." नर्सरीत ही मुलगी माझ्या वर्गात होती, इथपर्यंत ठीक आहे. पण ती मला रडवीत असे, हे कशाला महत्त्वाचा होतं, कुणास ठाऊक. "आता हिला ओळख..." "अगं  आई काय तू..."  "हे बघ, प्रिया, अनघा, अगदी तुझ्या पक्या चे सुद्धा फोटो आहेत माझ्या फोन वर!" आई अभिमानाने म्हणाली. "पक्या?" "पंकज पाध्ये रे, नववीत तुझ्या वर्गात होता तो? तो थायलंड ला असतो, बरीच वर्ष झाली आता. एक दोन वर्षात कॅनडा ला शिफ्ट व्हायच म्हणतोय." मी आ वाचून आई कडे पहातच राहिलो! माझा हा नववीतला मित्र, माझ्य...

शिक्षा न देता मुलांना शिस्त लावता येईल का?

Image:  Designed by Freepik "प्रिय पालक, तुमचा मुलगा जेवणाचा डबा न संपवता मधल्या सुट्टीत खेळायला जातो. बाईंनीं वर्गात थांबून डबा आधी संपवायला सांगितले तरीही ऐकत नाही. तरी आपण त्याला ताकीद करावी कि अशी वागणूक भविष्यात सहन केली जाणार नाही " बाईंनी चिट्ठी पाठवली. "मम्मी, सही करून देशील?" माझ्या लहानग्याने विचारलं. मी चिट्ठी वाचून त्याच्याकडे निरखून पाहिलं. माझ्या रंगवण्याची, ओरडण्याची, तो वाट पाहत होता. मी म्हटलं, " अरे, तुझ्या टीचर ने आधीच नंबर लावला कि! मीच तिला चिट्ठी लिहिणार होते खरं तर, कि माझ्या मुलाचा डबा अर्धवट घरी परत येतो, 'तरी प्लीझ तुम्ही लक्ष द्याल का, म्हणून!" एक मिनिट पूर्ण शांततेत गेला. आणि मग आम्ही दोघंही भरभरून हसलो!

आईचा ब्रेक

मिस्टर सानेंनी हळू डोळे उघडले. खिडकीतून उन्हं येत होती. खाडकन जागे झाले. दुपार झाली कि काय! घड्याळ बघितल, हुश्श, आठच वाजतायेत! पण पुढच्याच क्षणी लक्षात आलं, आठ वाजले तरी किचन मधून काही आवाज येत नाहीयेत. आज तर गुरुवार, वर्किंग डे, एव्हाना किचन मधून आवाजच नव्हे तर तर-तर्हेचे वासही यायला हवेत. डबा तयार झाला असला पाहिजे, चहा तयार झाला आला पाहिजे. पण आज कसलीच हालचाल दिसत नाही! शेजारी पहिल तर मिसेस सानेही शेजारी नाहीत. काय भानगड आहे बुआ आज?   चष्मा चढवून मिस्टर साने बेडरूम मधून बाहेर आले. मिसेस सानेंचा घरात कुठेच पत्ता नव्हता! गेली कुठे  ही? मिस्टर सानेंनी सुनबाईंना विचारायच ठरवलं. पण श्वेता त्यांना कुठे दिसेना. इतक्यात, "गुडमॉर्निंग  बाबा!" म्हणत श्वेता जांभई देत बाहेर आली आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता, तडक  "गुडमॉर्निंग आई" म्हणत किचन मध्ये गेली. मिस्टर साने तिला काही सांगणार इतक्यात,  "अहो बाबा, आई कुठेयत?" म्हणत पुन्हा बाहेर आली. एव्हाना तिची झोप पूर्णपणे उडाली होती. "माहित नाही बुआ, मला वाटलं तुला काही बोलली असेल..."   त्यांन...

कुठे गेला तो आईचा पदर

आजकाल व्हॉटसॅप च फार वेड लागलाय लोकांना. सकाळ संध्याकाळ नुसता व्हॉटसॅप आणि त्यावर येणारे जोक्स! लहान मुलांपासून ते रिटायर्ड आजी आजोबांपर्यंत घरातले सगळेच ह्या व्हॉटसॅप चे दिवाणे. बरं नुसतेच जोक्स फॉरवर्ड करतात ह्यावर असं काही नाही; ह्याचा उपयोग बऱ्याच वेगवेगळ्या कामांसाठी करता येतो. म्हणजे अर्जंट निरोप द्यायचा असो, किंवा कुणाला महत्वाची माहिती पाठवायची असो; इतकंच काय तर सणा सुदिच्या शुभेच्छा पण ह्या व्हॉटसॅप वरून अगदी सोप्या आणि फटाफट पणे पोहोचवता येतात! हो, हो, हे सगळं तुम्हाला माहीत आहे; पण तुम्हाला हे माहित आहे का, कि कुणाला शालजोडीतून मारायचं असेल तरीही हा व्हॉटसॅप आपल्या अगदी मस्त उपयोगी पडतो? हो ना, जे म्हणायचंय ते म्हणून घ्या, ते हि एखाद्या मिश्किल विनोदाच्या आडून. किंवा कुणाला लेक्चर द्यायचं असेल तर पाठवा एक मार्मिक कविता; कि वाचणाऱ्याची पार विकेटच गेली पाहिजे! आता हेच उदाहरण घ्या. बरेच दिवस व्हॉटसॅप वर एक कविता शेयर होत होती. आता नाव नाही आठवत नीटसं पण मर्म हे कि आजकालच्या नवयुवती जीन्स घालतात, अगदी आई झाल्या नंतर सुद्धा - आणि मग जेव्हा आजकाल ची मुलं...