"ओळख पाहू ही कोण?" मी आईच्या हातातल्या फोन मध्ये डोकावलो. फोटोत एक तरुणी, सायकल वर स्वार, ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट घातलेली, कॅमेऱ्याकडे पाहून स्मितहास्य करीत होती. "अरे पाहतोयस काय नुसता, ओळख ना कोण आहे ही." पुन्हा आईने विचारले. मी मक्खपणे मान हलवली. "मला नाही माहीत." "अरे, हि नमिता! छत्र्यांची!" "बरं..." "अरे बरं काय? तुझ्या शाळेत होती ही! नर्सरीत तुझा डबा खायची बघ? आणि तू उपाशी, रडत रडत घरी यायचास..." नर्सरीत ही मुलगी माझ्या वर्गात होती, इथपर्यंत ठीक आहे. पण ती मला रडवीत असे, हे कशाला महत्त्वाचा होतं, कुणास ठाऊक. "आता हिला ओळख..." "अगं आई काय तू..." "हे बघ, प्रिया, अनघा, अगदी तुझ्या पक्या चे सुद्धा फोटो आहेत माझ्या फोन वर!" आई अभिमानाने म्हणाली. "पक्या?" "पंकज पाध्ये रे, नववीत तुझ्या वर्गात होता तो? तो थायलंड ला असतो, बरीच वर्ष झाली आता. एक दोन वर्षात कॅनडा ला शिफ्ट व्हायच म्हणतोय." मी आ वाचून आई कडे पहातच राहिलो! माझा हा नववीतला मित्र, माझ्य...
Seeing the extraordinary in the ordinary