आजकाल व्हॉटसॅप च फार वेड लागलाय लोकांना. सकाळ संध्याकाळ नुसता व्हॉटसॅप आणि त्यावर येणारे जोक्स! लहान मुलांपासून ते रिटायर्ड आजी आजोबांपर्यंत घरातले सगळेच ह्या व्हॉटसॅप चे दिवाणे. बरं नुसतेच जोक्स फॉरवर्ड करतात ह्यावर असं काही नाही; ह्याचा उपयोग बऱ्याच वेगवेगळ्या कामांसाठी करता येतो. म्हणजे अर्जंट निरोप द्यायचा असो, किंवा कुणाला महत्वाची माहिती पाठवायची असो; इतकंच काय तर सणा सुदिच्या शुभेच्छा पण ह्या व्हॉटसॅप वरून अगदी सोप्या आणि फटाफट पणे पोहोचवता येतात! हो, हो, हे सगळं तुम्हाला माहीत आहे; पण तुम्हाला हे माहित आहे का, कि कुणाला शालजोडीतून मारायचं असेल तरीही हा व्हॉटसॅप आपल्या अगदी मस्त उपयोगी पडतो? हो ना, जे म्हणायचंय ते म्हणून घ्या, ते हि एखाद्या मिश्किल विनोदाच्या आडून. किंवा कुणाला लेक्चर द्यायचं असेल तर पाठवा एक मार्मिक कविता; कि वाचणाऱ्याची पार विकेटच गेली पाहिजे! आता हेच उदाहरण घ्या. बरेच दिवस व्हॉटसॅप वर एक कविता शेयर होत होती. आता नाव नाही आठवत नीटसं पण मर्म हे कि आजकालच्या नवयुवती जीन्स घालतात, अगदी आई झाल्या नंतर सुद्धा - आणि मग जेव्हा आजकाल ची मुलं...
Seeing the extraordinary in the ordinary