Image: Designed by Freepik "प्रिय पालक, तुमचा मुलगा जेवणाचा डबा न संपवता मधल्या सुट्टीत खेळायला जातो. बाईंनीं वर्गात थांबून डबा आधी संपवायला सांगितले तरीही ऐकत नाही. तरी आपण त्याला ताकीद करावी कि अशी वागणूक भविष्यात सहन केली जाणार नाही " बाईंनी चिट्ठी पाठवली. "मम्मी, सही करून देशील?" माझ्या लहानग्याने विचारलं. मी चिट्ठी वाचून त्याच्याकडे निरखून पाहिलं. माझ्या रंगवण्याची, ओरडण्याची, तो वाट पाहत होता. मी म्हटलं, " अरे, तुझ्या टीचर ने आधीच नंबर लावला कि! मीच तिला चिट्ठी लिहिणार होते खरं तर, कि माझ्या मुलाचा डबा अर्धवट घरी परत येतो, 'तरी प्लीझ तुम्ही लक्ष द्याल का, म्हणून!" एक मिनिट पूर्ण शांततेत गेला. आणि मग आम्ही दोघंही भरभरून हसलो!
Seeing the extraordinary in the ordinary